Pune : पुणे शहरात थंडी कायम, शनिवारपासून तापमानात किंचित होणार वाढ

एमपीसी न्यूज – मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडी कायम असून राज्यातील सर्वात निच्चांकी तापमान अहमदनगर येथे (6.4 अंश सेल्सिअस) नोंदवण्यात आले . तर त्या खालोखाल पुण्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात अली आहे .

पुणे शहरात गेल्या तीन दिवसात तापमानात कमालीची घट जाणवते आहे . पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरातील पाषाण येथे 8.2 तर लोहगाव मध्ये 11.7 तापमानाची नोंद करण्यात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.