Pune : रूम खाली करा म्हणताच भाडेकरुंनी घर मालकाला बदडले

एमपीसी न्यूज : घर भाडे देण्यावरून  (Pune) मालक आणि भाडेकरूमध्ये वाद झाला. त्यानंतर घरमालकाने रूम खाली करा असे म्हणताच चार भाडेकरूनी मिळून घरमालकाला बेदम मारहाण केली. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुस्कान मंजिल संजय पार्क येथे 30 मेच्या रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी घरमालक अरबाज मुजीब शेख यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी वसीम शेख, मोहसीन शेख, शाहबाज शेख आणि उबेद या चार जणांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम मोहसीन आणि शहाबाज हे फिर्यादी यांचे भाडेकरू आहेत. ते विमान नगर येथील संजय पार्क लेन नंबर एक येथील मुस्कान मंजिल या इमारतीत भाड्याने राहतात. घरमालक आणि त्यांच्या घराच्या भाड्यावरून बेबनाव निर्माण झाला होता.

Khed : खेड तालुक्यात शेतकऱ्यांकडून नांगरटी सुरु

त्यामुळे घरमालकांनी त्यांना रूम खाली करा असे (Pune) सांगितले. त्याच कारणावरून फिर्यादी यांच्यासोबत भांडण करून आरोपी मोहसीन शेख यांनी त्यांच्या डोक्यात क्रिकेटच्या लाकडी स्टंपने मारून त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.