Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अग्रगण्य ‘न्यूज पोर्टल’ने आपला कार्यविस्तार केला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात देखील ‘एमपीसी न्यूज’चा वटवृक्ष वाढत आहे. ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 10 जानेवारी 2020) रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वाचकांच्या शुभेच्छा आणि पाठबळामुळे ‘एमपीसी न्यूज’ने अकरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘एमपीसी न्यूज’ने पिंपरी-चिंचवडमधील यशस्वी वाटचालीनंतर पुणे शहरात देखील कार्यविस्तार केला आहे.

मागील तीन वर्षांपासून ‘एमपीसी न्यूज’ पुणे शहरातील अचूक घडामोडी वाचकांपर्यंत तात्काळ पोहोचवत आहे. पुणे कार्यालयाने तीन वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. त्याबाबत सर्व वाचक आणि हितचिंतकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. 10 जानेवारी 2020) रोजी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरमयी गुरुकुल हॉल, 1206-बी/16, हॉटेल शिवसागर गल्ली, जंगली महाराज रोड, संभाजी उद्यानासमोर, डेक्कन जिमखाना, पुणे – 4 येथे हा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम होणार आहे. ‘एमपीसी न्यूज’च्या या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित राहून आम्हाला पुढील वाटचालीसाठी नवे बळ द्यावे, ही आग्रहाची विनंती.

HB_POST_END_FTR-A2
You might also like