Pune : विनापरवानगी विदेशवारी करणारे महापालिकेचे ‘ते’ तीन अधिकारी अखेर निलंबित

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – विनापरवानगी ऑस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील ‘ते’ तीन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी निलंबित केले.

पाणीपुरवठा विभागातील अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर, उपअभियंता डी. एस. गायकवाड आणि कनिष्ठ अभियंता संदीप सपकाळ अशी निलंबीत केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या पैशांवर कुटुंबासह आॅस्ट्रेलिया दौरा केल्याचा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आरोप केला होता.

पुणे शहरात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ हा कायदा लागू आहे. तरीही, हा दौरा अधिकाऱ्यांनी केला.तसेच, विदेशवारी करून आल्यावर ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची तपासणीही करण्यात आली नसतानाही हे अधिकारी कामावर हजर होते, त्याबाबत विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.