Pune: हजार रुपयांच्या लाचेसाठी ‘या’ लिपिकावर आली तुरुंगात जाण्याची वेळ

Pune: The time has come for a clerk to go to jail for a bribe of Rs 1,000 only

एमपीसी न्यूज – एक हजार रुपयांची लाच स्वीकारणे इंदापूरच्या तलाठी कार्यालयातील एका लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. कारण ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

नितेशकुमार धोंडीराम धर्मापुरीकर (वय 35) असे या प्रकरणातील आरोपी लिपिकाचे नाव आहे.

वाटणी झालेल्या जमिनीची नोंद तहसील कार्यालयातील एस. आर. रजिस्टरला घेण्यासाठी संबंधित लिपिकाने तक्रारदार व्यक्तीकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. हो नाही ही करता-करता तडजोडीअंती एक हजार रुपये लाच देण्याचे ठरले.

तक्रारदार व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी एक हजार रुपयाची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं.

इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.