Pune : ‘कोरोना’बाधित रुग्णांची पुण्यात एकूण संख्या 16; तर, 27 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुण्यात एकूण 16 कोरोनाचे रुग्ण आढळले असून आज 27 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ काँफरन्सद्वारे संवाद साधला. त्यात नवीन सूचना संध्याकाळपर्यन्त येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले, सात देशांच्या यादीत अजून तीन देश समाविष्ट करणार आहेत. त्यात दुबई , सौदी अरेबिया आणि युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांचा समावेश करणार आहे.

आपत्ती निवारण निधी सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देणार असून तो विभागीय आयुक्तांकडे दिला जाईल. तिथून तो आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांना दिला जाईल, असेही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे महापालिकेच्या 125 आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 50 टीमतर्फे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात विविध व्यावसायिक आणि इंडस्ट्रीसोबत बैठक संपन्न झाली आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करू देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, कुठेही उत्पादन थांबवण्याची कोणतीही सूचना नाही.

ओला आणि इतर खासगी टॅक्सी ड्राइव्हरसोबत बैठक संपन्न पार पडली आहे. ‘कोरोनाग्रस्त ड्रायव्हर ओला’चा नव्हता. त्या व्यक्तीने ओला सांगितल्यामुळे ओलाचा उल्लेख केला.

144 पिंपरी चिंचवड लागू करण्यात आली आहे. पुण्यातही ते अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. ते निर्णय घेतील, संचारबंदी लागू नाही पण, नागरीकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी यावेळी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.