Pune : ट्रेकिंग पलटण ग्रुप पुणे तर्फे देवकुंडवर राबविले स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – ट्रेकिंग पलटण ग्रुप पुणे तर्फे देवकुंड धबधबा (जि.रायगड) येथे रविवारी (दि. 10 नोव्हेंबर 2019 रोजी) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या धबधब्याला पावसाळ्यात पर्यटक मोठ्या भेटी देतात.

ट्रेकमार्गावर तसेच धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आणि शीतपेय बाटल्या, फूड पँकेट्स फेकून देतात. ट्रेकिंग पलटणने ट्रेकमार्गावरील झुडुपांमध्ये तसेच पाणी प्रवाहात आणि आजूबाजूला टाकून दिलेला पर्यावरणास घातक कचरा उचलून स्थानिक गाईडकडे सुपूर्द केला.

या स्वच्छता मोहिमेत ट्रेकिंग पलटण ग्रुपचे साईनाथ जगदाळे, परशुराम भांगरे, संदीप चौधरी, हेमंत पाटील , पवन पाटील, ललित बागल, नरेश इरापल्ले, श्रीरंग गोरसे, भार्गव इरापल्ले, शिवराज बुगडे, संतोष डेंगळे, योगेश पवार, प्रणव घोडके आणि डॉ. सुरेश इसावे यांनी योगदान दिले. या मोहिमेचे नियोजन प्रा. डॉ. सुरेश इसावे यांनी केले. प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांनी नियोजनात मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.