Pune : स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रवाना; 49 प्रवाशांची घरवापसी

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथून कोल्हापूरला दोन बसेस रविवारी रवाना झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून स्वारगेट येथून कोल्हापूरसाठी बसेस रवाना करण्यात आल्या.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने, सरचिटणीस राजेश पांडे, डॉ श्रीपाद ढेकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी, गणेश शेरला, सतिश काळे उपस्थित होते.

आज 49 लोकांना आपल्या घरी जाता आले. त्यापूर्वी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना मास्क, सॅनिटायजर, जेवण देण्यात आले. भारतीय जनता पार्टी पुणे शहरतर्फे ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. पुणे शहरात कोरोनामुळे अडकलेल्या अनेक कामगार व विद्यार्थी यांना स्वतःच्या व हक्काच्या घरी जाण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून या बसेस पाठविण्यात आल्या. आगामी काळातही कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात बसेस पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

ज्या नागरिकांना या जिल्ह्यात घरवापसी करायची असेल त्यांनी गणेश शेरला मो. न. 9881478859, सतिष काळे 8552940937 यांच्याशी संपर्क करावा.

दरम्यान, पुणे शहरात अडकलेल्या अनेक कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी बसेसची श्रीनाथ भिमाले यांनी मोफत सोय केली आहे. इतर जिल्ह्यातही बसेस पाठविण्यासाठी प्रशासनाला विंनती करण्यात आली आहे.

जशी जशी परवानगी मिळेल, तशा टप्याटप्याने बसेसमधून नागरिकांना घरी सोडण्यात येणार आहे. हा प्रवास करण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.