_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांचा होणार लिलाव

हा लिलाव शुक्रवारी (दि. 14 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता एअरपोर्ट रोड, पुणे येथील पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) कार्यालय येथे होणार आहे. : The vehicles will be auctioned

एमपीसी न्यूज – धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांचा पुणे पोलीस लिलाव करणार आहेत. हा लिलाव शुक्रवारी (दि. 14 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता एअरपोर्ट रोड, पुणे येथील पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) कार्यालय येथे होणार आहे.

पुणे वाहतूक विभागाने नोव्हेंबर2017 पासून 173 बेवारस वाहने जमा केली होती. वाहन धारकांनी आपापली वाहने ओळखून ती घेऊन जाण्याचे पुणे वाहतूक शाखेकडून 5 ऑगस्ट रोजी आवाहन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यातील काही वाहने त्यांच्या मूळ मालकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नेली आहेत. सध्या 115 बेवारस दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने शिल्लक आहेत.

अनेक दिवसांपासून पडून असल्याने ही वाहने गंजून खराब झाली आहेत. वाहनांच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुणे वाहतूक शाखेकडून या वाहनांचा 14 ऑगस्ट रोजी लिलाव करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.