Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यालयास आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या भोसरी, पुणे येथील कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी ब्रह्मकेसरी मासिकाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट विधायक पुरस्कार देऊन सन्मानित केले.

  • तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनीष कुलकर्णी,प्रमोद कुरबेट, शशीकांत शिराळकर,निळकंठ मोरे, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.