Pune : कोरोनाच्या संकट काळात ‘स्मार्ट सिटी’ची वॉर रूम ठरतेय महत्वपूर्ण

The war room of the 'smart city' is important during the crisis of Corona

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना पुणे स्मार्ट सिटीची वॉर रूम महत्वपूर्ण ठरत आहे. पुणे स्मार्ट सीटीने ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर करून आणि संशयित रुग्णांचे मॅपिंग केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात असताना या ठिकाणी भेट देत या प्रणालीचे कौतूक केले होते.

एरव्ही समोरच्याचे जास्त न ऐकणाऱ्या पवारांनी शांतपणे सर्व माहिती समजून घेतली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती सादर केली. यापुढे पूरनियंत्रण, ड्रेनेज, आपत्ती व्यवस्थापनासाठीही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ट्रॅक, ट्रेस व टेस्ट ही अत्यंत महत्वाची त्रिसूत्री आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचे रूपांतर वॉर रूममध्ये करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता, भविष्यात लागणारे बेड्स, डॉकटर संख्या, डॅश बोर्डवर अपडेट केली जाते.

त्यामुळे पुढील कार्यवाही तातडीने करणे सोपे जाते. अजित पवार यांनीही या प्रणालीचे कौतुक केले आहे. शहरातील कोरोना तातडीने आटोक्यात आणा, त्यासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे निक्षून सांगितले. पुणे स्मार्ट सीटीने ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर करून आणि संशयित रुग्णांचे मॅपिंग केले आहे.

तसेच, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बफर झोन तयार केले जात आहेत. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाबरोबरच स्मार्ट सीटीची जबाबदारीही रुबल अग्रवाल यांच्याकडे आहे. त्यांनी ही यंत्रणा सुद्धा कोरोनाच्या कामाला लावली आहे.

आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सोबतच महापालिकेचे सर्वच अधिकारी कोरोनाचे संकट कमी होण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. दरम्यान, आतापर्यंत महापालिकेच्या 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची रोगाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.