Pune : पी.एफ.वर नॉमिनी असल्याचे सांगत महिलेला 31 हजाराला फसवले

एमपीसी न्यूज – पी.एफ.वर नॉमिनी असल्याचे सांगून महिलेच्या खात्यातून 31 हजार रुपये ऑनलाइन पध्दतीने काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी एरंडवणे येथे राहणाऱ्या एका 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस अज्ञात इसमांनी फोन करून तुमच्या सासऱ्यांच्या पी. एफ. वर तुमचे पती नॉमिनी आहेत असे सांगितले. ती रक्कम मिळविण्यासाठी अज्ञातांनी महिलेस त्यांच्या पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच सासऱ्यांचे डेथ सर्टिफिकेट कुरियरने पाठविण्यात सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेस पी. एफ.च्या रकमेवर टॅक्स म्हणून 31 हजार 48 रुपये एनईएफटी करण्यास सांगितले.
इतकेच नाही तर महिलेचे आणि त्यांच्या पतीचे जॉईंट असलेल्या खात्यातून 31 हजार 48 रुपये एनईएफटीने ट्रान्सफर करून महिलेची फसवणूक केली.

याप्रकरणी 2 अज्ञात मोबाईलधाकर महिलांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.