Pune : इन्स्टाग्रामवर ओळख करून दामदुप्पटचे आमिष दाखवून तरुणाची 16 हजारांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज – इन्स्टाग्रामवर ओळख करून दामदुप्पटचे आमिष दाखवून तरुणाची 16 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
2 डिसेंबर 2018 पासून ऑनलाइन माध्यमाद्वारे ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड येथे राहणाऱ्या तरुणाशी एका अज्ञात इसमाने इन्स्टाग्रामवर ओळख करून मोबाईल नंबर घेऊन संपर्क केला. त्याने तरुणाचा विश्वास संपादन करून एका हप्त्यासाठी पैसे गुंतवल्यास ते दामदुप्पटीने परत मिळतील, असे सांगून आमिष दाखवले. त्याप्रमाणे तरूणाने देखील विश्वास ठेवून 16 हजार पेटीएमद्वारे ट्रान्सफर केले. परंतु इसमाने कोणताही परतावा न देता तरुणाची फसवणूक केली.

याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.