Pune : कॅम्प परिसरात अज्ञाताकडून धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कॅनॉल मध्ये टाकल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी (दि.31) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कॅम्प येथील कन्या शाळेच्या पाठीमागे घडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्योती पन्हाळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प येथील कन्या शाळेच्या पाठीमागे कोणतरी अज्ञात इसमाने अंदाजे 30 ते 35 वयाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केला आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात फेकून देण्यात आला होता .याप्रकरणी अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून , पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.