Pune : उड्डाणपुलावर चढलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने सुखरूप उतरवले खाली

एमपीसी न्यूज : जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई व्हावी (Pune) यासाठी तरुणाने संचेती पुलावर चढून आंदोलन केले होते. या तरुणाला अग्निशमन दलातील जवानांनी सुखरूप खाली उतरवले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी पुलावर चढले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांनी त्याला खाली उतरवले.
जमिनीच्या वादातून हा तरुण पुलावर चढला होता. जुन्नरचे तहसीलदार शेतकर्यांचे प्रश्न सोडवित नाही. त्या प्रश्नावर महेंद्र नावाचा तरुण मागील तीन तासभरापासून आंदोलन करीत होता. तो सुखरूप खाली उतरला आहे.