Pune – दूचाकी आडवून युवक-युवतीला लुटून चोरटे पसार

एमपीसी न्यूज – दूचाकीवर रात्री घरी निघालेल्या युवक – युवतीला आडवून त्यांच्याजवळील वस्तू जबरगस्तीने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.19) रात्री पावणे दहाच्या दरम्यान वडगाव बुद्रुक येथील जिजामाता बहुउद्देशीय केंद्र तुकाईनगर येथे घडली.
याप्रकरणी एका 25 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि तिचा मित्र हे दोघेजण अॅक्टीव्हा गाडीवर रात्री घरी चालले होते. दरम्यान एका  मोटारसायकल वरून तीन अज्ञात इसम आले आणि त्यांनी त्यांची मोटारसायकल अॅक्टीव्हाला आडवी मारूली. आणि अचानक पाठीमागे बसलेले दोघेजण मोटारसायकलवरून खाली उतरले. आणि त्यातील एकाजणाने कोयत्यासारख्या हत्याराने तरूणीच्या मित्राला मारले.  आणि त्याच्या साथीदाराने तिच्या पर्समधील 700 रूपयांची रोकड,गळ्यातील चांदिची चैन, आणि 16 हजार 700 रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.
याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.