Pune Theft: पुण्यात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

 एमपीसी न्यूज : पुण्यात इलिका कंपनीच्य़ा 3 लाख 24 हजार रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू चोरणाऱ्या दोन सराईतांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.7) करण्यात आली.(Pune Theft) यावेळी त्यांच्याकडून 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

श्रवणलाल विष्णाराम चौधरी (वय.30 रा.चेतरा,राजस्थान) व राजूराम कुशालराम चौधरी (वय.32 केसनंद, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 18 ते 19 जुलै रोजी कात्रज येथे पार्क केलेला टेम्पोचे सील तोडून त्यातील इलिका इलेक्ट्रीक कंपनीच्या 3 लाख 24 हजार 71 किचन चिमणी चोरून नेली होती.

Pune News : राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा –  देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी याचा तपास करत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पिसोळी येथे आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक टेम्पो, फ्रीज,डी मार्डचे सामान, 25 प्रेशर कुकर असा एकूण 23 लाख 4 हजार 555 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.(Pune Theft) पोलीस तपासात त्यांच्यावरील पुण्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर तेलंगणा हैद्राबाद येथील 20 गुन्हे उघडकीस आले आहेत.याचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.