Pune – कात्रज प्राणी संग्रहालयात चंदनाच्या झाडांची चोरी

एमपीसी न्यूज – प्राणी संग्रहालयातील 15 हजार रूपये किंमतीची 2 चंदनाची झाडे कापून चोरी केल्याची घटना रविवारी (दि.2) रात्री 10 नंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात घडली आहे.
प्रदिप बुदगु़डे (वय 46, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात असणा-या सर्पोद्यानाच्या आवारात प्रवेश करून एका अज्ञात इसमाने रविवारी रात्री 10 नंतर प्रवेश केला. त्या इसमाने लांडगा खंदक आणि काळवीट खंदक भागातील दोन चंदनाची झाडे कापली आणि त्याने दोन चंदनाच्या झाडाच्या ओंडक्याचा तब्बल 15 हजार रुपयांचा भाग चोरी करून नेला.
याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.