Pune : शहरात आहेत तब्बल 69 कंटेन्मेंट झोन

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने 69 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्याचबरोबर या भागांतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्व दुकाने 17 मे पर्यंत बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. नागरिकांना महापालिकेतर्फे घरोघरी जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात येत आहेत.

हे आहेत 69 कंटेन्मेंट झोन

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल, तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा.

धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट, सर्व पेठा, रविवार पेठ,रांका ज्वेलर्स रविवार‌पेठ, बुरडी पूल,बालाजी फरसाण पालखी विठोबा,पांगूळ आळी,कसबा पेठ,सोमवार पेठ,मंगळवार पेठ,ढोर गल्ली, जवळ जवळ सर्व गल्लीबोळातून ‌एकमेकाशी संपर्क होऊ न देण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.