Pune : धरणांत आहे पुरेसा पाणीसाठा; अजित पवार यांचा पुणेकरांना दिलासा

एमपीसी न्यूज – आपल्या तडकाफडकी निर्णयामुळे चर्चेत असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याचे सांगत शनिवारी पुणेकरांना दिलासा दिला.

24 टीएमसी पेक्षा जास्त पाणी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत उपलब्ध आहे. मागील याच वर्षी हा पाणीसाठा 18 टीएमसी होता. सध्या 6 टीएमसी पाणी जास्त आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पुणे शहराच्या पाण्यात कपात करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट आदेश अजित पवार यांनी दिल्याचे समजते.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेसाठीही बराच वेळ गेला. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणारी कालवा समितीची बैठक लांबतच चालली होती. अखेर शनिवारी या बैठकीला मुहूर्त मिळाला. जलसंपदा विभाग वारंवार महापालिकेला इशारा देत असतो. या अधिकाऱ्यांनाही पवार यांना धक्का दिल्याची कुजबुज आहे. पुणे महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाने सुनावले होते.

मागील वर्षीपेक्षा यंदा तब्बल 6 टीएमसी धरणांत पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांसोबतच शेतीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. यंदा कधी नव्हे ती धरणे काटोकाट भरली होती. सुमारे 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.