BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शहरात हेल्मेट सक्तीला स्थगिती देलेली नाही – देवेंद्र फडणवीस

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे शहरात हेल्मेट सक्तीला कोणतीही स्थगिती देलेली नाही. तर, रस्त्यावर कारवाई कारण्याऐवजी चलन पाठवण्यात येणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्यातही दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे, हे निश्चित आहे.

तसेच नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होते. त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीच्या साहाय्याने कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

  • नियम मोडणाऱ्यांवर रस्त्यावर कारवाई कारण्याऐवजी दंडाचे चलन आकारुन कार्यालय किंवा घरच्या पत्यावर पाठवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले सांगितले. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.

एक जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू केली. या विरोधात शहरातील विविध संघटना एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

HB_POST_END_FTR-A1
.