Pune: … म्हणून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा!

एमपीसी न्यूज – तिकीट वाटप लिस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत विचारत न घेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः लिस्ट तयार केली. तिकिटा संदर्भात कसल्याही चर्चेत अजित पवार यांना स्थान न दिल्याने अजित पवार यांचा तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. नेतृत्व करण्यावरून पवार कुटुंबात अंतर्गत संघर्ष उफाळुन आल्याची कुजबूज सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी ही अजित पवार यांचा वाद जगजाहीर आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, राजीनामा देताना त्यांनी कोणतेही ठोस कारण सांगितले नसल्याचेही समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) अचानक आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. असे असताना अजित पवार यांनी आज अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.