Pune : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी या सायबर सुरक्षेच्या काही टिप्स

एमपीसी न्यूज – कोरोना या आजारामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच आयटी कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करत असताना मोठ्या प्रमाणावर इंटरनेट व त्याच्याशी निगडीत अप्लिकेशन आणि इतर साधनांचा वापर होतो. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरीला जाणे आणि इतर गंडांतराचे प्रकार घडत असतात. यापासून बचावासाठी खबरदारी म्हणून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1) सर्व डीफॉल्ट पासवर्ड बदला आणि सर्व डिव्हाइस आणि ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा.

2) मीटिंगच्या लिंक सार्वजनिक करू नका किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामायिक करू नका.

3) सहयोगी कार्यासाठी किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कंपनी कडून मंजूर केलेल्या विश्वसनीय अॅप्लिकेशनचाच वापर करा.

4) सर्व ऑपरेटिंग सिस्टम आणि अँटीव्हायरस
अॅप्लिकेशन अद्ययावत ठेवा.

5) फ्रि वाय-फायचा वापर टाळा. आपल्या होम वाय-फाय आणि अॅडमीन डीफॉल्ट पासवर्ड बदला.

6) फिशिंग ईमेलबद्दल सावधगिरी बाळगा जो कदाचित तुमच्या मुळ मेल आयडी बरोबर मिळता जुळता असू शकतो. तेव्हा तो ईमेल आयडी उघडण्यापूर्वी लिंक योग्य प्रकारे तपासा.

7) ऑफिस सिस्टममध्ये वापर करण्यासाठी सुरक्षित नेटवर्कचा वापर करा.

8) आवश्यक नाही तोपर्यंत रिमोट अॅक्सेस बंद ठेवा. आवश्यक असल्यास ते योग्य सुरक्षिततेसह वापरावे.

9) कामासाठी आणि इतर कार्यांसाठी एकाच डिव्हाईसचा वापर करु नका.

10) शक्यतो कामासाठी कंपनीद्वारे पुरविण्यात आलेला संगणक आणि लॅपटॉपचा वापर करा.

लॉकडाऊनच्या काळात काही ऑनलाईन चोरटे तुमचा अतिमहत्त्वाचा डेटा वेगवेगळ्या पद्धतीने चोरू शकतात तसेच ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करत असताना वरील काही टिप्स अवश्य लक्षात ठेवून त्यांचा वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.