BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्रेयसीला फिरवण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी ‘ते’ करायचे चोऱ्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एक पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने सापळा रचून अटक केली. यावेळी त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी तब्बल 38 गुन्हे केल्याचे कबूल केले यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, आणि वाहनचोरी यांचा समावेश आहे.

गौरव ऊर्फ लाल्या फडणीस, ऋषिकेश ऊर्फ पक्या श्रीकांत गाडे, चांद फक्रुद्दीन शेख, गणेश बाळासाहेब कांबळे, सूर्यकांत किसन कोळी आणि रोहित तय्यब काझी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • त्यांच्याकडे केलेला आधी चौकशीत आरोपीनी हे सर्व गुन्हे प्रेयसीवर खर्च करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चारशे ग्रॅम सोने, पाच ग्रॅम चांदी आणि 11 दुचाकी असा तब्बल अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.