Pune: चोर आले अन् घरातील भांडे, साड्या घेऊन गेले

Pune: Thieves came and took away utensils and sari एका बंद घराचे कुलूप तोडून साड्या, पितळेची भांडी, रोख रक्कम असा एकूण सहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

एमपीसी न्यूज- बारामती तालुक्यात चोरट्याने उच्छाद मांडला असून उंडवडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून साड्या, पितळेची भांडी, रोख रक्कम असा एकूण सहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रशांत साळुंखे यांनी फिर्याद दिली असून बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे 5 जुलै ते 20 जुलै या दरम्यान घर बंद करून बाहेर गेले होते. 20 तारखेला ते घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून 200 रुपये किमतीच्या आठ साड्या, 25 किलो पितळेची भांडी, आठ किलो वजनाची स्टीलची भांडी, जुना डीव्हीडी प्लेयर दोन सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक घोलप करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.