Pune : सोनं चोरून चोरट्यांनी पुरले शेतात; पुणे पोलिसांनी मेटल डिटेक्टरने काढले शोधून, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : सराफी दुकानातील सोनं चोरून (Pune) चोरट्यांनी शेतात पुरले. पोलिसांनी ते मेटल डिटेक्टरने शोधून आरोपीना अटक केली असून हा प्रकार फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप गिल्ल यांनी दिली.  

1 जानेवारी रोजी सर्वत्र नववर्षाचे स्वागत उत्साहात होत असताना, पुण्यातील रविवार पेठेतील राज कास्टिंग नावाच्या सोन्याच्या दुकानात पहाटे  5 किलो 323 ग्रॅम सोने आणि 10 लाख रोख रक्कमेची चोरी झाल्याने खळबळ उडाली. ही चोरी या दुकानात काम करणाऱ्या मुख्य आरोपी आरोपी सुनील कोकरे याने आपल्या इतर 3 साथीदारांसोबत केल्याचे समोर आले. हा आजी वारल्याचे कारण सांगत गावी निघून गेला होता. पोलिसांनी तपास करत कोकरेसह त्याचा साथीदारांना 24 तासात बेड्या ठोकल्या होत्या,

यापैकी 3 आरोपी हे सांगली येथील जत तालुक्यात तर एक आरोपी (Pune) कोल्हापूर येथे लपून बसला होता. या आरोपीनी संपूर्ण माल विभागून शेतात लपवल्याने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परंतु, सांगली पोलिसांच्या मदतीने मेटल डिटेक्टरने जवळजवळ साडेतीन किलोचा माल आणि 9 लाख 71 हजार शोधून काढण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे. या चारही जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.