Pune: तिसरे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा लवकरच पुन्हा महापालिकेच्या सेवेत

Pune: Third Additional Commissioner Bipin Sharma will soon return to the Municipal Corporation

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा लवकरच रुजू होणार आहेत. विदेशात अभ्यासाठी गेलेले शर्मा पुण्यात दाखल झाले आहेत. ते जूनमध्ये सेवेत दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल यांची सध्या चांगलीच धावपळ होत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. बिपीन शर्मा मागील वर्षी अभ्यासासाठी विदेशात गेले होते. मागील आठवड्यात ते पुण्यात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तो कालावधी संपल्यानंतर ते महापालिकेत रुजू होणार आहेत.

पुणे शहरात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सात ‘आयएएस’ अधिकारी कार्यरत आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या देखरेखीखाली करोनाबाबत उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी हे अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. तरीही पुण्यातील कोरोना वाढताच आहे. झोपडपट्ट्या भागांत प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात आली आहे.

सध्या कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या रोगामुळे जेष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार असे विविध आजार असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनातर्फे म्हटले आहे.

दुसरीकडे या रोगातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे नागरिकांनी  घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.