Pune : ‘पूर्णब्रह्म’च्या जयंती कठाळे उलगडणार यशोगाथा

'मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क'चा तिसरा वर्धापनदिन; आदर्श उद्योजक-उद्योजिका पुरस्कार

एमपीसी न्यूज- मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल पूर्णब्रह्मच्या संचालिका जयंती कठाळे यांचे विशेष मार्गदर्शन आयोजिले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 10) संध्याकाळी पाच वाजता वाजता घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी मनस्विनी फूडचे संचालक मनीष शिरसाव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, तर युनिटेक ऍटोमेशनचे भरत भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत. फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘आदर्श उद्योजक-उद्योजिका’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून, सुपनेरकर भोजन प्रबंधच्या संचालिका मीना सुपनेरकर, मेगाक्राफ़्ट एंटरप्रायझेसच्या संचालिका अंजली आपटे, राकेश ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीजचे संचालक प्रताप जाधव आणि अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम म्हणजे मराठी उद्योजकांनी मराठी उदयोजकांसाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. विविध व्यवसायातील लोकांशी विचारांची देवाणघेवाण करून व्यवसायाची व्याप्ती वाढविणे. या विचारांतून फोरम काम करत आहे. फोरमतर्फे महिन्याला सभासदांची बैठक घेऊन उद्योजकांना एकमेकांशी जोडले आहे. उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी, राजेश जोशी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1