Pune : ‘ते’ दादा रडतात अन् ‘हे’ दादा लढतात – गिरीश बापट; चंद्रकांत पाटील यांचे केलं कौतुक

एमपीसी न्यूज – ‘ते’ (अजित पवार) दादा रडतात,  ‘हे’ (चंद्रकांत पाटील) दादा लढतात,  यापूर्वीच्या दादांनी काय परंपरा पडल्या. त्याला पुणेकर हसतात,  अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी चंद्रकांत पाटील यांचे गुणगान करीत, भविष्यातील नेतृत्व मान्य केले. सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आशिष गार्डन कोथरूड येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

दादांचे सर्व आयुष्य कार्यकर्ता म्हणून गेले. त्यांचे कार्य बघून डोळ्यात पाणी येईल. नेता नंतर ते अगोदर कार्यकर्ता आहेत. पुणे मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल, असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

खासदार संजयनाना काकडे यांनी पाटील हे 1 लाख 15 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावर चिमटा काढताना बापट म्हणाले, काकडे यांचे सर्वच अंदाज खरे ठरत नाही, ‘लगी तो लगी’, तरीही त्यांचे अंदाज खरे ठरो आणि तुमचा तोंडात रेशनची साखर पडो, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.