Pune : लॉकडाऊनमध्येही मजेत आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री

Pune: Marathi actress Prajakta Mali is enjoying also in lockdown

एमपीसी न्यूज : तुमच्या जवळ क्रिएटिव्हीटी असली तर कुठेही असलात तरी तुम्हाला त्रास होत नाही. स्वत:ची काळजी कशी घ्यायची याचे तुमचे काहीतरी मापदंड ठरवून ठेवले की मग वाळवंटातदेखील तुम्ही मजा करु शकता. सध्या तर काय तुम्ही तुमच्या माणसांमध्येच आहात. आणि घरात राहून मजा करत आहात. अशा परिस्थितीत सकारात्मक वृत्ती ठेवली की मग काहीच त्रास होत नाही. असा सल्ला जणूकाही एका मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिकांना आपल्या कृतीतून दिला आहे.

करोनाच्या साथीमुळे चित्रपट, नाट्य, मालिका सृष्टी ठप्प झाली आहे. अभिनेते, अभिनेत्री आपापल्या घरी लॉकडाऊन आहेत. पण याही परिस्थितीत तुम्ही सकारात्मक राहू शकता असा सल्ला अनेकजण देत आहेत. पुणे शहरातील बहुतांश भाग हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मराठमोळी, नृत्यकुशल अभिनेत्री प्राजक्ता माळीही आपल्या पुण्यातील घरात आहे. मात्र, रेड झोनमध्ये असल्याचा प्राजक्ताला जरासाही त्रास होत नाहीये. आपल्या घरातील अंगणासमोर असलेल्या बागेत निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ता चटई घालून वेळ घालवते आहे. आपल्या परिवारासोबत वेळ घालवतानाचे काही फोटो प्राजक्ताने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

लॉकडाउन काळात प्राजक्ता घरात राहून विविध उपक्रमात आपलं मन रमवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईकडून स्वयंपाकाचे खास धडे घेत जेवण बनवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती गमतीने म्हणाली होती की माझे वजन वाढल्यास त्याला आईचे लाड कारणीभूत असतील.

पण हे फिलिंगदेखील गोड असल्याचे तिला वाटते. यासोबत बागेत आईला मदत करण्यापासून ते वाचन या माध्यमातून प्राजक्ता वेळ घालवते आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी योगविद्येचं मार्गदर्शन आणि आहारासंदर्भातल्या काही टिप्स दिल्या होत्या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.