BNR-HDR-TOP-Mobile

Pune: यंदा बारामतीतील निवडणूक देशात इतिहास घडविणार -गिरीश बापट

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमदेवार गिरीश बापट यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली टीका

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ‘ज्या’ कुटुंबाने आजवर साम, दाम, दंड, भेद ही नीती अवलंबून निवडणुका जिंकल्या आहेत. आता त्यांना यंदाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ही निवडणूक समजणार आहे. तर यंदा बारामती लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक देशात इतिहास घडवणारी ठरणार आहे, अशा शब्दांत पुणे लोकसभेचे महायुतीचे उमदेवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. तर या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात बैठक पार पडली. यावेळी योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, भिमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर तसेच भाजप आणि शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गिरीश बापट म्हणाले, मतदारसंघात प्रचार करताना चेहर्‍यावर खूप आव आणून काम करू नका. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित रहा म्हणजे सर्व व्यवस्थित होईल. तसेच प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.