Pune : यंदाच्या वार्षिक मिळकतकरात सूट द्यावी – नगरसेवक आबा बागूल यांची मागणी

एमपीसी न्यूज – शहरातील पथारी, स्टॉलधारक, छोटे – मोठे व्यावसायिक, निवासी घरे यांना सन २०२०-२१ च्या वार्षिक मिळकतकरात सूट द्यावी, अशी मागणी नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

जगभरातील लॉकडाउनमुळे आर्थिक संकट येण्याची चिन्हे आहेत. याकरिता बँकांच्या मासिक हप्त्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. रेपो रेट कमी करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेनेही मिळकतकरात सूट देऊन नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, असे बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.