Pune : ‘त्या’ प्रवाशांचा ‘कॉरंटाइन’ ऐवजी हॉटेलबाहेर आढळतोय वावर; ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढण्याचा संभवतोय धोका

एमपीसी न्यूज – परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना सरकारी यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून कॉरंटाइन करण्यात येत आहे. ज्यांना सरकारी रुग्णालयात किंवा होस्टेलमध्ये रहायचं नाही अशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्वतःला कॉरंटाइन करून घेण्यास मुभा देण्यात आली आहे. पण, असे लोक खरंच स्वतःला कॉरंटाइन करतायत का? असा प्रश्न पडत आहे. यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी वाढण्याची भीती व्यक्त होत असून त्याचा धोकाही संभवत आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना सरकारी यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून कॉरंटाइन करण्यात येत आहे. त्यासाठी हॉस्पिटल्स आणि होस्टेल्सचाही उपयोग करून घेण्यात येतोय. पण, ज्यांना अशा सरकारी रुग्णालयात किंवा होस्टेलमध्ये रहायचं नाही अशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्वतःला कॉरंटाइन करून घेण्यास मुभा देण्यात आली आहे. पण, असे लोक खरंच स्वतःला कॉरंटाइन करतायत का? असा प्रश्न पडतोय. कारण, पुण्यातील एका हॉटेलमध्ये अशा व्यक्तीला खोलीच्या बाहेर सिगारेट ओढत फिरताना पाहिल्यावर गोंधळ उडाला.

त्यामुळे या हॉटेलमध्ये आधीपासून राहणाऱ्या लोकांनी याबाबत होटेल प्रशासनाला जाब विचारल्यावर हॉटेल प्रशासनाने माफी मागत चूक झाल्याची कबुली दिली आहे. या हॉटेलमधे अशाप्रकारे पाच जणांना कॉरंटाइन करण्यात आलं आहे. पण, याची कल्पना आम्हाला का देण्यात आली नाही, असा सवाल हॉटेलमध्ये आधीपासून राहणारे लोक विचारत आहेत.

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याना याबाबत विचारलं असता, त्या हॉटेलमध्ये आवश्यक ती काळजी घेतली गेली असेल, तुम्ही जिल्हाधिकाऱ्याना विचारा असं पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी म्हटलं आहे, तर जिल्हाधिकारी कामात व्यस्त आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.