Pune : चित्रीकरणासाठी निघालेल्या कलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्यांना बेड्या

एमपीसी न्यूज- मराठी चित्रपटात काम करणाऱ्या (Pune)  सिनेकलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, चोरलेले मोबाईल असा 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्वप्नील दादा कोतवाल (वय 23 वर्षे, रा. शिंदे वरती, हडपसर), महेश बबन गजेसिंह (वय 22, रा. भिमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने फिर्याद दिलेली आहे. वानवडी मधील बी.टी. कवडे रस्त्यावर 21मे रोजी ही घटना घडली.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेचा तायडे बनला तोतया आयएएस अधिकारी; पुणे पोलिसांकडून अटक

21 तारखेला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिनेसृष्टीत ज्युनिअर कलाकार म्हणुन काम करणारे फिर्यादी व त्यांचे मित्र हर्ष नाथे व जिशान पटनी असे सासवड येथे मराठी पिक्चरचे शुटींकरीता निघाले होते. त्यावेळी वानवडी पोलीस ठाणे हददीतील ॲव्हेंन्यू मॉल येथील बी.टी. कपडे रोडलगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान तेथे उभा असलेल्या एकाने जाणीवपूर्वक फिर्यादीस धक्का मारून शिवीगाळ केली. धारदार हत्यार काढून फिर्यादीचे मानेवर ठेवत पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले.

 “जान प्यारी है क्या, फोन प्यारा है, जान प्यारी है तो चल जाव’ अशी धमकी देत फोन आणि पैसे काढून घेतले. यावेळी येथे असलेल्या फिर्यादीचा मित्र हर्ष व जिशान यानांही हाताने मारहाण केली करून त्याचेकडील 19 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही आणि इतर माहितीनुसार आधारे आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली (Pune) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.