Pune – नोकरीचे आमिष दाखवून महिलेची साडेतीन लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज – नोकरीचे आमिष दाखवून आणि महिलेचा विश्वास संपादन करून साडेतीन लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणुक जुलै 2017 ते डिसेंबर 2017 या दरम्यान धनकवडी येथील के.के.मार्केट मध्ये करण्यात आली.

याप्रकरणी पद्मावती येथे राहणा-या एका 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना एका इसमाने नोकरीचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडून वेळोवेळी नोकरी साठी तब्बल 3 लाख 50 हजार रूपये घेतले परंतु त्यांना कोणतीही नोकरी न लावता त्यांची फसवणुक केली.

याप्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.