Pune: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – घरफोडी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 38 किलो चांदी, 1 किलो सोनं, 13 चारचाकी, 5 दुचाकी असा सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पैतरसिंग ऊर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय 19), निशांत अनिल ननवरे (वय 22) आणि हृषीकेश तानाजी आतकर (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील पैतरसिंग ऊर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक याच्यावर तब्बल 86 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून सुमारे 117 गुन्हे उघडकीस आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.