Pune : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक, दोघे फरार

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गोडाऊनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत (Pune) असणाऱ्या तिघांना लष्कर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शस्त्रासह अटक केले आहे. शनिवारी (दि.17) मध्यरात्री कॅम्प परिसरातील सोलापूर बाजार रोडवर ही कारवाई कऱण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी सुमित फ्रँकी हॉल (वय 29 रा. सोलापूर बाजार) कृष्ण बाळु भारसकर (वय 24 रा.गुळटेकडी) व प्रदिप रामा अडागळे (वय 32 रा.सोलापूर बाजार, कॅम्प) अशी अटक आरोपींची नावे असून दोन आरोपी फरार झाले आहेत.

Pune News : ‘बनारसी साडी’ संकल्पनेवर आधरित भव्य ‘शुभ शृंगार केक’ने वेधले जागतिक स्तरावरील नागरिकांचे लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोलापूर बाजार (Pune) येथील इलेक्ट्रॉनीक गोडाऊन येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पेपर स्प्रे, मोबाईल, घातक शस्त्रे एसा एकूण 62 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.