Pune : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक; कस्टम विभागाची कारवाई

52 किलो गांजा, दोन वाहने असा असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेले तिघांना कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 52.300  किलो गांज्याची सुमारे 25 पॅकेट्स आणि दोन वाहने असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खडकी रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी (दि. 30) वाहनांची तपासणी करताना अधिकाऱ्यांना हि कारवाई केली.

अशोक बी. पवार (रा. करमाळा, जि. सोलापूर), किरण गणपत पाणकर (रा. ता. मावळ, जि. पूणे) आणि सुधाकर निसर्ग कांबळे (रा. कात्रज, जि. पूणे) अशी अटक केल्याची नावे आहेत.

  • याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, कस्टम विभागाचे अधिकारी गुरुवारी (दि. ३०) खडकी रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी. त्यांना स्विफ्ट कार (MG 12 NB 0466) आणि महिंद्रा स्कॉर्पिओ (MH 12 EM 7377) या वाहनांत गांजाची सुमारे 25 पॅकेट्स एका बॅगमध्ये ठेवली होती.  तपासणी केल्यानंतर सुमारे 52.300 किलो गांजा असून त्यांची किंमत सुमारे 5 (पाच) लाख रुपये इतकी आहे.

यावेळी अधिकाऱ्यांनी अशोक बी. पवार (रा. करमाळा, जि. सोलापूर), किरण गणपत पाणकर (रा. ता. मावळ, जि. पूणे) आणि सुधाकर निसर्ग कांबळे (रा. कात्रज, जि. पूणे) यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, हा गांजा आम्ही पुण्यात विक्रीसाठी आणला होता.  यावेळी अधिकाऱ्यांनी या तिघांना अटक करून 52.300  किलो गांजा, दोन वाहने असा असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

  • याप्रकरणी तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच शहरात अशा प्रकारचे अंमली पदार्थ कोठून येतात? यांसह अनेक बाबीची चोकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.