Pune : तीन सायकलपटूंनी 17 दिवसांत 3773 किलोमीटर सायकलिंग करत बनविले जागतिक ग्रुप रेकॉर्ड

एमपीसी न्यूज – पुण्यातील तीन सायकलपटू प्रीती मस्के, राकेश जैन व प्रसन्न कुलकर्णी यांनी पुणे ते कन्याकुमारी एकूण 3773 किलोमीटर अंतर केवळ 17 दिवस 17 तास 17 मिनिटांमध्ये सायकलने पूर्ण करून नवीन जागतिक ग्रुप रेकॉर्ड बनवले.

या प्रवासादरम्यान त्यांनी लोकांपर्यंत ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’ तसेच फिट इंडिया मुव्हमेंटचा संदेश देत आठवड्यातून एक दिवस ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश पोहोचहावण्याचे काम केले. यामध्ये भारतातील पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, आसाम अशा वेगवेगळ्या भागातील 15 सायकलपटूंनी भाग घेतला.

16 नोव्हेंबर 2019 रोजी काश्मीरवरून सर्व सायकलपटू निघाले. काश्मीर, जम्मू, हरियाणा, दिल्ली, जयपूर, कोटा, इंदोर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, हुबळी, सालेम, मदुराई, कोविलपट्टीवरून 3 डिसेंम्बर रोजी हे सायकलपटू कन्याकुमारीला पोहोचले. ते दररोज जवळजवळ 200 किलोमीटर अंतर सायकलिंग करत होते.

या प्रवासात त्यांना सायकल रिपेअरही स्वतःच करायचे होते. तसेच काश्मीरमध्ये भूस्खलन झाल्यामुळे ही टीम 27 तास ररस्त्यावर अडकली होती. तापमानामध्ये 3 डिग्रीपासून ते 35 डिग्रीपर्यंतचे बदल, ऊन, बर्फ वर्षाव, थंडी अशा वातावरणात त्यांनी सायकलिंग केले. यादरम्यान कित्येकांची तब्बेत बिघडली, सायकली बिघडल्या, तरीही सर्वानी जिद्दीने त्यावर मात केली आणि अथक परिश्रमातून ही अनोखी सफर पूर्ण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.