Pune : कोरोनामुळे ससून रुग्णालयात तिघांचा मृत्यू

Three died at Sassoon Hospital due to corona

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयात आज, बुधवारी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.  आजपर्यंत 153 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 146 जण या रोगामुळे दगावले आहेत.

नाना पेठेतील 37 वार्षीय पुरुष, भवानी पेठेतील 60 वर्षीय आणि मंगळवार पेठेतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असेही आजार होते, असे ससून रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. विशेषतः ससून रुग्णालयात रोजच बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्हयातील 6 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

सध्या ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. एकूण 295 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आज पुणे जिल्ह्यात 301 रुग्णांची वाढ झाली. पुणे शहरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सध्या कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जेष्ठ नागरिकांनी कोरोनापासून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात आता 6 हजार 604 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. तर, तब्बल 295 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.