Pune : पुणे विमानतळावरून कोलकाता , कोचीन आणि चेन्नईसाठी तीन विमानांचे उड्डाण

एमपीसीन्यूज : पुणे विमानतळावरून कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई येथील 372 प्रवाशांना घेऊन तीन विमानाचे उड्डाण झाले. तर
दिल्ली विमानतळावरून दोन विमानातून 158 प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती. तसेच २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. आतापर्यंत तीनवेळा लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. सध्या चौथा लॉकडाऊन सुरु आहे.

या कालावधीत देशभरातील अनेक निर्बंध उठविण्यात आले आहेत. तसेच काही अटींवर सार्वजनिक वाहतूक करण्यात सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली येथून दोन विमानातून 158 प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत.

तर पुणे विमानतळावरून कोलकाता, कोचीन आणि चेन्नईसाठी तीन विमानांचे उड्डाण झाले. त्यामुळे पुण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाणे शक्य झाले. देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.