Pune: भारती विद्यापीठातील एमबीएच्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होते. 

संगीता नेगी (वय 22), शुभम राज सिन्हा (वय 22) आणि शिव कुमार (वय 22) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. तिघांचा मृतदेह शोधण्यात यश आले.

याबाबतची माहिती अशी की पुण्यातील भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे शिक्षण घेणारे दहा 1 मे रोजी सुट्टी असल्यामुळे सहलीसाठी मुळशी धरण परिसरात फिरायला गेले होते. रात्रभर त्यांनी नाईट आऊट केल्यानंतर आज सकाळी त्यातील काहीजण धरणात पोहण्यासाठी उतरले. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण आणि एक तरुणी पाण्यात बुडाले. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांना तिघांचा मृतदेह शोधण्यात यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.