Pune पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरूच; दोन दिवसात तीन ठिकाणी फायरींग

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कायदा आणि व्यवस्था अस्तित्वात आहे ( Pune ) का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील दोन दिवसात पुणे शहरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत.काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून एकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे भुमकर चौक, सिंहगड रोड येथे घडली.

गणेश गायकवाड (रा. वारजे माळवाडी) यांच्यावर गोळीबार झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास सिंहगड रोडवरील भुमकर चौकात गणेश गायकवाड आणि अन्य काही लोकांची काडीपेटी मागण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावरून अनोळखी व्यक्तींनी गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

Talegaon : हिंदमाता पुलाजवळ पिकअप अडकले

तत्पूर्वी बुधवारी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी दिसून नादुरुस्त झाल्याने हा तरुण बचावला. तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हाती शेवाळवाडी परिसरात व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या ( Pune ) झाडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.