Pune: शहरात तीन नवीन कोरोना पॉझिटीव्ह, कोरोनाबाधितांचा आकडा 46 वर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज एकूण तीन रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. राज्यात मुंबईत पाच व बुलढाण्यात दोन नवीन कोरोनाबाधित सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 230 झाली आहे. देशात काल एका दिेवसात 227 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार 251 झाली आहे.

राज्यात कोरोनाचे एकूण 10 नवीन रुग्ण सापडले असून त्यात पुणे शहरातील प्रथम दोन रुग्ण आढळले. त्यात एक महिला व एक पुरुष असा दोघांचा समावेेश आहे. पुरुष परदेशात जाऊन आला असून महिला मात्र परदेशात जाऊन आल्याची पार्श्वभूमी नाही. त्यात आणखी एका पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29, पिंपरी-चिंचवडमधील 12 तर ग्रामीण भागातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच  तर पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46 झाली आहे. पुण्यात काल एका 52 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 230 वर जाऊन पोहचला आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 10 झाली आहे.

देशात काल एका दिवसात 227 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 1,251 झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची व बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झालेला असून कोणीही कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.