pune: शहरात तीन नवीन कोरोना ‘पॉझिटीव्ह’, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 101 वर!

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात नवीन तीन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 झाली आहे. साताऱ्यातही एक नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 101 वर जाऊन पोहचली आहे.

पुण्यात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचा कोरोना बरा झाल्याची दिलासादायक बातमी पाठोपाठ तीन नवीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची चिंताजनक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 वरून 19 पर्यंत वाढली आहे.

राज्यात काल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 होती. पुण्यात तीन व सातारा येथे एक असे नवीन चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like