Pune : शहरात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू!; जिल्ह्यात मृतांचा आकडा 44 वर, रुग्ण संख्या 407

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून बुधवारी आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 42 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 44 झाली आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 362 तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 407 झाली आहे. 

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून अर्धा शहराचा भाग सील करण्यात आला आहे. पोलिसांनी संचारबंदी ही लागू केली आहे. तरीही नागरिक रस्त्यावर येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आज 4 नागरिकांचा बळी गेला.

  • पुण्यात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !
    पुणे शहरात आज सकाळपासून 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात भवानी पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा आणि शिवाजीनगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा व गोखलेनगर येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पहिल्या रुग्णाला किडनीचा आजार तर दुसऱ्या रुग्णाला स्थूलतेची समस्या होती तर तिसऱ्या रुग्णालाही कोरोनाव्यतिरिक्त अन्य जोखमीचे आजार होते, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. या व्यतिरिक्त आणखी एका रुग्णाचा संध्याकाळी मृत्यू झाला.

या मृत रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील भवानी पेठेत सर्वाधिक रुग्ण असून याच भागात कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कसबा – विश्रामबागवाडा, ढोलेपाटील रोड, कोंढवा, बिबवेवाडी परिसरातही कोरोनाचे वाढते रुग्ण चिंताजनक आहे.

कोरोनामुळे ज्या नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांना यापूर्वी आणखी काही आजार होते. किडनी, रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गर्भवती महिलेला ‘कोरोना’
पुण्यात आणखी एका गर्भवती महिलेला कोरोना झाला आहे. तर यागोदर एका महिलेला कोरोना झाला होता. दोन्ही महिलांवर भरती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही महिला भवानी पेठेत राहायला आहेत. दुसऱ्या महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉकटर, नर्सेस यांना क्वारंटाईन केले जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.