Pune : कात्रज प्राणी संग्रहालयात नवीन सदस्य; चार बछड्यांचे नामकरण

एमपीसी न्यूज – कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ रिध्दी आणि बागीराम या वाघांच्या जोडीने चार महिण्यापूर्वी चार वाघांच्या बछड्यांना जन्म दिला होता. ही बछडे आता सुदृढ स्थितीत असून नुकतेच महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत त्यांचे नामकरण करण्यात आले. आकाश, गुरु, सार्थक आणि पोर्णिमा अशी या बछड्यांची नावे ठेवण्यात आली आहेत.

या चारही बछड्यांची देखभाल चांगली झाल्याने आणि कात्रज प्राणी संग्रहालयातील वातावरण भावल्याने हे सर्व बछडे सुदृढ बनले आहेत. नामकरणाच्या निमित्ताने या चारही बछड्यांना आज मोकळ्या वातावरणात वावरण्याची संधी मिळाली. तीन नर आणि एक मादी असलेल्या या बछड्यांचा काल नामकरण सोहळा पार पडला.

यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे, कात्रज प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. राजकुमार जाधव, पालिकेचे उद्यानप्रमुख अशोक घोरपडे आदी उपस्थित होते. काही दिवसानंतर हे बछडे आता पुणेकरांना पाहता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.