Pune : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईसह तिघांचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज- कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलाचा व त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी वाघोली येथील भैरवनाथ तलावात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

रोहिणी संजय पाटोळे (35), स्वप्नील संजय पाटोळे (12) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (37) अशी तिघा मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पाटोळे या आपला मुलगा स्वप्नीलला घेऊन भैरवनाथ तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. रोहिणी कपडे धुवत असताना, स्वप्निल तलावाच्या बाजूला खेळत असताना पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी रोहिणी यांनी पाण्यात उडी मारली. पण ते दोघे पाण्यात बुडू लागले.

त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दत्तात्रय जाधव यांना दिसताच त्यांनी देखील दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र मायलेकराचा मृतदेह शोधण्याच काम चालू होते लोणीकंद पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.