Pune : बंदुकीचा धाक दाखवून दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी व्यापाऱ्याला लुटले

एमपीसी न्यूज – दुकान बंद करून घरी निघालेल्या व्यापाऱ्याच्या हातातील 65 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी पळवून नेली. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांनी हातातील बंदुकीमधून गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि.15) रात्री साडेआठच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गल्ली क्रमांक 3 येथील पुरणचंद अँड सन्स या दुकानासमोर घडली.

या प्रकरणी आशिष गुप्ता यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष गुप्ता हे रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकीवरून आलेल्या तीन चोरटयांनी गुप्ता यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. गुप्ता यांच्या कामगाराने त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एकाने त्यांच्याजवळील बंदुकीने हवेत गोळीबार करून चोरटे पसार झाले.

नकली बंदुकीमधून गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.