Pune: क्रेनच्या धडकेत तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

Pune: Three-year-old boy dies in crane crash, mother critically injured भरधाव जात असलेल्या क्रेनने माय-लेकरांना जोराची धडक दिली. यामध्ये चिमुकल्या सुभाषचा जागीच मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज- वानवडीतील संविधान चौक येथे क्रेनने धडक दिल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. आई आणि मुलगा रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.

सुभाष जाधव (वय 3) असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर रेखा भारत जाधव (वय 22) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. वानवडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून क्रेन चालकाला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत सुभाष आणि त्याची आई रस्ता ओलांडत होते. याच वेळी गंगा सेटॅलाइट मार्गावरून एक क्रेन संविधान चौकाच्या दिशेने येत होती.

भरधाव जात असलेल्या क्रेनने माय-लेकरांना जोराची धडक दिली. यामध्ये चिमुकल्या सुभाषचा जागीच मृत्यू झाला. जखमी आईवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून क्रेन चालकाला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.